गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३

गोदावरी नदीचे प्रदूषण



नदी पात्रातून  जेसीबीच्या साह्याने घाण काढताना कर्मचारी

भारतातील महत्वाची नदी व महाराष्ट्राची गंगा म्हणून आज भारतभर गोदावरी नदी प्रचलित आहे.सन २०१५ साली कुभमेळा नाशिक मध्ये होणार आहे.या शिवाय गोदावरी नदी नाशिक,अहमदनगर,ओरंगाबाद या जिल्ह्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरवते. नदीकाठच्या अनेक गावाचे जीवन या नदीवर अवलंबून आहे.परंतु आज मात्र नाशिक शहरातून नदी वाहताना नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे असे जाणवते.
        नदीमध्ये शहरतील अनेक वस्त्यामधील सांडपाणी नदीपात्रात सोडल्याचे पहावयास मिळते.दररोज भारतभरातून अनेक पर्यटक येथे येत्तात.हे भाविक नदीत स्नान करत्तात व अनेकदा कपड़ेही धुत्तात यामुळे गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.येथील नियंत्रण नाशिक महानगर पालिकेच्या नियंत्रण कक्षेत आहे.महापालीकेचे कर्मचारी येथे दंडात्मक कारवाई वेळोवेळी करताना दिसतात परतु दररोज येथे नदीकाठी राहणारे लोकच अधिक घाण करताना दिसतात.दररोज अनेक धार्मिक विधी रामकुंडावर होत असतात.या आपल्या  दररोजच्या धार्मिक विधीची निर्माल्ये या नदीतच टाकली जातात.त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होताना दिसत आहे.
    याशिवाय नदी पात्रालगत दररोज वाहने,कपडे धुण्याचे प्रकार निदर्शनास येतात, अशा पाण्याचा वापर पुढील नदीकाठची गावे पिण्यासाठी करतात.असे पाणी पिल्याने अनेक लोक दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.काही दिवसांपूर्वी नाशिक आणि नगर यांच्यात पाण्यावरून वाद झाल्याचे बघितले आहे.आज लोक शेतीसाठी पाणी मागत आहेत परंतु येत्या काही दिवसात लोक पिण्याच्या पाण्यासाठी भांडण करताना दिसतील.महाराष्ट्राची पुढील परिस्तिती दुष्काळाची आहे.आज बहुतांशी गावांना टँकरने पाणी पुरवण्याची सोय शासनाने केली आहे.आगामी काळात पाणी बचत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य आहे.जर पाणीच नाही राहिले तर मग आपले जीवन संपुष्टात येईल.



 

कपडे धुण्यामुळे आणि गवत उगवल्याने दूषित झालेले पाणी


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा