बुधवार, २० मार्च, २०१३

दुष्काळ आणि पाणी बचत


  

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. समस्या दूर करण्यासाठी शासन प्रयत्न करूनही ठोस उपाय निघत नहिये.अशातच दुष्काळी परिस्थिती निवारणसाठी मंजूर करण्यात आलेला निधी प्रत्यक्षात दुष्काळ ग्रसतापर्यंत पोहचत नाहीये. दुष्काळ परिस्थिती निवारणासाठी सुरुवातीला चर्चा होती की यंदा दुष्काळ फक्त विदर्भातील जिल्ह्यात आहे. परतू महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई अन दुष्काळ असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई अकस्मात उद्भवलेली आहे का? यंदा पाऊस कमी पडला याचाच परिणाम भूजलाचाही बेसुमार उपसा शेतकरी व मानव समुहाने केला. त्यामुळे येत्या काही दिवसात तीव्र पाणीटंचाई उदभवणार असून त्यातूनच जीवनावश्यक गरजांची समस्या उभी राहणार हे दिसते आहे.


यंदा महाराष्ट्राच्या खुप कमी ठिकाणावर पाऊस झाला आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. परिणामी विविध ठिकाणच्या धरण-तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. मोठया धरणांना क्षमतेच्या तुलनेत फारच कमी पाणी मिळाले. नाशिक जिल्हयातीली गोदावरी नदीवरीली गंगापूर धरण यामुळेच पूर्ण भरू शकलेले नाही .परीणामी योग्य नियोजन न झाल्याने शासन आता येथे पाणी बचत करताना दिसते आहे.शेतीत, घरगुती वापरात आणि उद्योगधंद्यात होणारा पाण्याचा अपव्ययही कमी करता आलेला नाही.


आपण पाणी वाचविले तर पाहिजेच पण साठविलेही पाहिजे. जमिनीतील पाणी उपसून आपण ते संपवत आहोत. मात्र जमिनीतील पाणी साठवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. आपण रेन हार्वेस्टिंग सारख्या प्रकल्पांचा पाणी वाचविण्यासाठी उपयोग करावयास हवा. पाणी हे अमृत असल्यामुळेच त्याची बचतही केली पाहिजे. पाणी वाचविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आह़े जे नैसर्गिक संकट ओढावले आहे त्याला तोंड देता आले पाहिज़े पाण्याचा काटकसरीने वापर करा़. प्रशासनाने पाणीपुरवठय़ाचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे असे जनतेला वारंवार सांगितले जाते परतू खरच आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा.
दुष्काळाने होरपळलाय बळीराजा
[फोटो सौजन्य -गुगल ]
विहरिची पाण्याची पातळी गाठली
[फोटो सौजन्य -गुगल ]

1 टिप्पणी: