बुधवार, २० मार्च, २०१३

“ रेन हार्वेस्टिंग ” काळाची गरज

 पाण्याचे महत्व लक्षात घेउन महाराष्ट्र शासनाकडून पावसाचे पाणी वाचविण्यासाठी सातत्याने अनेक योजना राबविल्या जातात.त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जलसंधारण विभाग कार्यरत आहे.पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी शासन भर देत असते.पाणी अडवा पाणी जिरवा हि राज्य शासनाची एक महत्वपूर्ण योजना,वाहून जाणारे पावसाचे पाणी वाचविण्यासाठी सन.२००६ पासून रेन हार्वेस्टिंग हि योजना शासनाने सुरु केली.याच प्रबोधनातून राज्यभर शासनाने रेन हार्वेस्टिंग प्रकल्प उभे केले आहेत.

सरकारी कार्यालय,इमारती मधील पाण्याचे अनियोजन,विजेचा होणारा अपव्यय, हा नेहमी मिडियासाठी बातमीचा विषय,पण या सर्व चर्चाना अपवाद ठरावे असे नाशिक शहरातील पांडवलेणी येथील महाराष्ट्र शासनाचे विक्रीकर भवन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत बांधकाम झालेल्या विक्रीकर भवनाचे मॉडेल तयार करताना “ रेन हार्वेस्टिंग ” प्रकल्प राबविण्याची योजना आखण्यात आली.आणि केवळ कागदावरच नाही तर प्रत्यक्षात बांधकाम करतांना त्याची अंमलबजावणी केली गेली.हा राज्यासाठी आगामी दुष्काळात एक प्रभावी उपाय आहे.

रेन हार्वेस्टिंग चे नियोजन करतांना इमारतीच्या बांधकामाच्या वेळीपाणी इमारतीच्या मधोमध साधारण ३ लक्ष [गरजेनुसार] लिटर क्षमतेची पाणी साठविण्यासाठी टाकी बांधली जाते.इमारतीच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी ड्रेनेज [गटारात] मध्ये न सोडता पाईपद्वारे या टाकीत सोडले जाते.सुरुवातीला एक-दोन मोठ्या पावसाने गच्ची स्वच्छ होईपर्यत पाणी टाकीत जाऊ न देता बाहेर सोडले जाते.टाकीत साठवण केलेल्या पाण्याचा उपयोग स्वच्छता गृहाच्या दैनंदिन वापरासाठी केला जाते.याशिवाय इमारतीच्या परिसरात असणाऱ्या बगिचा व झाडांसाठी हेच पाणी वापरात आणले जाते.किमान आठ नऊ महिने पुरेल,वापरात येईल इतका हा पाणीसाठा आहे.याहून सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गरज पडल्यास योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी देखील वापरण्यात येते.

आगामी शहरांचे नियोजन करतांना बांधकाम विभागाने ईमारत परिसरात रेन हार्वेस्टिंग प्रकल्प असणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.पाण्याचा अपव्यय्य टाळण्यासाठी व पाणी बचतीसाठी हे एक प्रभावी तंत्र आहे.या तंत्राचा वापर सर्व सुशिक्षित वर्गाने केला तर नक्कीच आपण आगामी काळात पाणी बचतीचे एक उत्क्रुस्ट तंत्र विकसित करू.


या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे संकलन केले जाते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा