गुरुवार, २१ मार्च, २०१३

शहर आणि पाणी बचत





शहरात सध्या एकच वेळी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला .काहीना याचा आनंद झाला तर काहीना मात्र दुख, शहरातील काही परिसरात एक वेळही पाणीपुरवठा होत नाही .कमी दाबामुळे काहीना पाणी मिळत नाही. या कमी दाबामुळे नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे. याचा सर्वंकष विचार करून शहराच्या पाणीपुरवठय़ामधील वेळापत्रकात बदल करून फक्त मंगळवारी पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गंगापूर धरणातील शहराला 15 जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी सध्या स्थिती असतांना पाऊस लांबल्यास तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.याचा विचार मनपा प्रशासनाने करण्याची गरज आहे. पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्याने त्यानंतरच्या काही दिवस बहुतांशी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

शहरातील लोक मात्र प्रशासनाच्या नावाने व प्रशासन लोकांना दोषी ठरवितातच धन्यता मानत आहे. परंतू वास्तवात मात्र एकमेकाना दोष देतच दिवस ढकलले जातत. पाणी बचत हे सर्वाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी पुढकार घ्यायला हवा. जर जर आपण पाणी बचत करु शकत नसू तर आपणाला पाणी नासविण्याचाही आधीकार नाही. त्यामुळेच पाणी बचत म्हणजेच पाणी निर्मिती,जर आपन पाणी निर्माण करु शकत नाही तर आपण पाणी बचत करून पाणी निर्माण केले असे समजावे.

शहरातील विविध ठिकाणी गरज नसताना अनेक ठिकाणी पाणी नासविण्याची चित्रे पहावयास मिळतात जर अशीच परिस्थती सर्व ठिकाणी दिसत असेल तर मात्र प्रशासनाल कडक कायदा पाण्यासाठी करावा लागेल जसे काही दिवसापूर्वी निफाड येथे शेतकर्याना अटक करावी लागली.पाण्यावरून अटक झाल्यची हि पहिलीच घटना असवी. अशी परीस्थिती कुणावरही येवू नये यासाठी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.



एकीकडे पाणी बचत करण्यास मनपा प्रशासन सांगत आहे तर दुसरीकडे मात्र शहरातील कॉलेजरोड वरील दुभाजक धुण्याचे  काम करताना कामगार 



महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात


या वर्षी संपूर्ण भारतभर दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.सध्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.पूर्वी मराठवाडा आणि विदर्भातच दुष्काळ पडत असे.परंतु या वर्षी पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसलेला आहे.सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मराठवाड्याचा टॅकरवाडा झालेला दिसून येतो.तर विदर्भात अजूनच भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे.

महाराष्टाच्या तुलनेत गुजरातमध्ये याउलट परिस्थिती आहे.येथे पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विकास होताना दिसत आहे.मागील १० वर्षात गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करता गुजरात सगळ्याच बाबतींत महाराष्ट्राच्या पुढे आहे.येथे रस्ता,वीज,पाणी आणि आरोग्य या पायाभूत सुविधा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचलेले आहेत.

गुजरात राज्याने पुढील योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या 

साबरमती नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून प्रश्न सोडवला
कॅनोलवर सौरउर्जा निर्माण करण्यात आली आहेत.याचा परीनाम म्हणजे पाणी बाष्पीभवन थांबण्यास मदत होते.














बुधवार, २० मार्च, २०१३

“ रेन हार्वेस्टिंग ” काळाची गरज

 पाण्याचे महत्व लक्षात घेउन महाराष्ट्र शासनाकडून पावसाचे पाणी वाचविण्यासाठी सातत्याने अनेक योजना राबविल्या जातात.त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जलसंधारण विभाग कार्यरत आहे.पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी शासन भर देत असते.पाणी अडवा पाणी जिरवा हि राज्य शासनाची एक महत्वपूर्ण योजना,वाहून जाणारे पावसाचे पाणी वाचविण्यासाठी सन.२००६ पासून रेन हार्वेस्टिंग हि योजना शासनाने सुरु केली.याच प्रबोधनातून राज्यभर शासनाने रेन हार्वेस्टिंग प्रकल्प उभे केले आहेत.

सरकारी कार्यालय,इमारती मधील पाण्याचे अनियोजन,विजेचा होणारा अपव्यय, हा नेहमी मिडियासाठी बातमीचा विषय,पण या सर्व चर्चाना अपवाद ठरावे असे नाशिक शहरातील पांडवलेणी येथील महाराष्ट्र शासनाचे विक्रीकर भवन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत बांधकाम झालेल्या विक्रीकर भवनाचे मॉडेल तयार करताना “ रेन हार्वेस्टिंग ” प्रकल्प राबविण्याची योजना आखण्यात आली.आणि केवळ कागदावरच नाही तर प्रत्यक्षात बांधकाम करतांना त्याची अंमलबजावणी केली गेली.हा राज्यासाठी आगामी दुष्काळात एक प्रभावी उपाय आहे.

रेन हार्वेस्टिंग चे नियोजन करतांना इमारतीच्या बांधकामाच्या वेळीपाणी इमारतीच्या मधोमध साधारण ३ लक्ष [गरजेनुसार] लिटर क्षमतेची पाणी साठविण्यासाठी टाकी बांधली जाते.इमारतीच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी ड्रेनेज [गटारात] मध्ये न सोडता पाईपद्वारे या टाकीत सोडले जाते.सुरुवातीला एक-दोन मोठ्या पावसाने गच्ची स्वच्छ होईपर्यत पाणी टाकीत जाऊ न देता बाहेर सोडले जाते.टाकीत साठवण केलेल्या पाण्याचा उपयोग स्वच्छता गृहाच्या दैनंदिन वापरासाठी केला जाते.याशिवाय इमारतीच्या परिसरात असणाऱ्या बगिचा व झाडांसाठी हेच पाणी वापरात आणले जाते.किमान आठ नऊ महिने पुरेल,वापरात येईल इतका हा पाणीसाठा आहे.याहून सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गरज पडल्यास योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी देखील वापरण्यात येते.

आगामी शहरांचे नियोजन करतांना बांधकाम विभागाने ईमारत परिसरात रेन हार्वेस्टिंग प्रकल्प असणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.पाण्याचा अपव्यय्य टाळण्यासाठी व पाणी बचतीसाठी हे एक प्रभावी तंत्र आहे.या तंत्राचा वापर सर्व सुशिक्षित वर्गाने केला तर नक्कीच आपण आगामी काळात पाणी बचतीचे एक उत्क्रुस्ट तंत्र विकसित करू.


या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे संकलन केले जाते


दुष्काळ आणि पाणी बचत


  

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. समस्या दूर करण्यासाठी शासन प्रयत्न करूनही ठोस उपाय निघत नहिये.अशातच दुष्काळी परिस्थिती निवारणसाठी मंजूर करण्यात आलेला निधी प्रत्यक्षात दुष्काळ ग्रसतापर्यंत पोहचत नाहीये. दुष्काळ परिस्थिती निवारणासाठी सुरुवातीला चर्चा होती की यंदा दुष्काळ फक्त विदर्भातील जिल्ह्यात आहे. परतू महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई अन दुष्काळ असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई अकस्मात उद्भवलेली आहे का? यंदा पाऊस कमी पडला याचाच परिणाम भूजलाचाही बेसुमार उपसा शेतकरी व मानव समुहाने केला. त्यामुळे येत्या काही दिवसात तीव्र पाणीटंचाई उदभवणार असून त्यातूनच जीवनावश्यक गरजांची समस्या उभी राहणार हे दिसते आहे.


यंदा महाराष्ट्राच्या खुप कमी ठिकाणावर पाऊस झाला आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. परिणामी विविध ठिकाणच्या धरण-तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. मोठया धरणांना क्षमतेच्या तुलनेत फारच कमी पाणी मिळाले. नाशिक जिल्हयातीली गोदावरी नदीवरीली गंगापूर धरण यामुळेच पूर्ण भरू शकलेले नाही .परीणामी योग्य नियोजन न झाल्याने शासन आता येथे पाणी बचत करताना दिसते आहे.शेतीत, घरगुती वापरात आणि उद्योगधंद्यात होणारा पाण्याचा अपव्ययही कमी करता आलेला नाही.


आपण पाणी वाचविले तर पाहिजेच पण साठविलेही पाहिजे. जमिनीतील पाणी उपसून आपण ते संपवत आहोत. मात्र जमिनीतील पाणी साठवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. आपण रेन हार्वेस्टिंग सारख्या प्रकल्पांचा पाणी वाचविण्यासाठी उपयोग करावयास हवा. पाणी हे अमृत असल्यामुळेच त्याची बचतही केली पाहिजे. पाणी वाचविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आह़े जे नैसर्गिक संकट ओढावले आहे त्याला तोंड देता आले पाहिज़े पाण्याचा काटकसरीने वापर करा़. प्रशासनाने पाणीपुरवठय़ाचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे असे जनतेला वारंवार सांगितले जाते परतू खरच आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा.
दुष्काळाने होरपळलाय बळीराजा
[फोटो सौजन्य -गुगल ]
विहरिची पाण्याची पातळी गाठली
[फोटो सौजन्य -गुगल ]